Saturday, June 19, 2021

गावरान पोळा...

 🖋माझा आईच्या आठवणीतील बैल-पोळा : *पिठोळा "

 आई स्वयंपाक करत असताना सहज तिला आठवण आली तिच्या माहेरातल्या लहानपणीच्या पोळयाची . आणि ती मला तिकडची गोष्ट सांगु लागली .तिकडची म्हणजे मराठवाडा (आईचे माहेर ) आणि खान्देश (सासर) .माझी आई म्हणजे दोन्ही संस्कृतींच अजब मिश्रण. 

  माझी आई सगळ्यात मोठी .सगळे मिळून ( मामा, मावशी आई , आणि बाबा -माळी) आधि पोळ्याच्या पहिल्या दिवशी रात्री शेणाने सारवलेल्या भिंतीवर चुन्याने बैल आणि शेतकर्‍याचे चित्र काढायचे आणि झोपून जायचे. मग सकाळी माळी भल्या पहाटेच उठुन वडे तळायची आणि स्वयंपाकाला सुरूवात करायची. मग माझी आई आणि सगळे मिळून बाकीच्या (म्हणजे पिठोळा काढायच्या ) कामाला सुरूवात करायचे. मग 'मरी-आईला बोनं द्यायला जात. तिकडे जाताना सगळं पुजेचं सामान आणि नैवेद्याचं ताट वाजत घेऊन जायचे. 

  तिथुन आल्यानंतर पिठोळ्याला सुरूवात व्हायची.मामाला भिंतीकडे तोंड करून बसायला लावायचे .मग आई, मावशी आणि माळी हातात मक्कीचे कणीस आणि वाईक घेऊन असे गाणे गायचे..... 

  पिठोळा -पिठोळा, 

  भावाचा पाठोळा. 

  पोळ्याच्या मातीच्या बैलांची पूजा. त्यांना मस्त गेरु लाऊन , दोरा गुंडाळायचा आणि त्यांसमोर सात प्रकारचे धान्य टाकून चंदनाचा टिळा लावायचा. 

 आणि मगच सगळेजण मिळुन एकत्र जेवण करायचे आणि तेव्हापर्यंत सगळे उपाशी रहायचे. 

  संध्याकाळी गावातल्या सगळ्या बैलांची शर्यत रहायची. जो शेतकरी त्यात जिंकला त्याला मानाचा 'नारळ' मिळायचा. पळुन बैल आणि शेतकरी थकलेले रहायचे. त्यामुळे गावात सगळया घरांसमोर बाज-खाट टाकुन त्यावर शाल आंथरून धान टाकायचे आणी बाजुला बादलीत पानी ठेवायचे. बैल घरासमोर आले की त्यांना पुरण-पोळ्या आणी धान्य खाऊ घालायचे. आणि मालकाला गुळ व पाणी द्यायचे...... 

  अशा प्रकारे त🖋माझा आईच्या आठवणीतील बैल-पोळा : *पिठोळा "

  अशा प्रकारे ते पोळा साजरा करत असत!!!. 

लेखक -़़विशाल गोसावी  🖋

2 comments:

  1. गावाकडची आठवण .. ‌‌अजुन पण गावपण जिवंत आहे!!!

    ReplyDelete